Uncategorized

ॲक्शन टेसाच्या सेमिनारला फर्निचर विक्रेते व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

विजय शिंदे

इंदापूर : इंजिनिअर्ड वुड आणि पॅनेल उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य ॲक्शन टेसा (Action TESA) कंपनीच्या वतीने इंदापूर येथील देशपांडे व्हेज येथे फर्निचर विक्रेते, व्यावसायिक तसेच ग्राहकांसाठी विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला शहर व परिसरातील फर्निचर विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी कंपनीच्या विविध उत्पादनांची, त्यांची वैशिष्ट्ये, गुणवत्ता तसेच फर्निचर आणि इंटिरियर क्षेत्रातील उपयोग याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. HDHMR, MDF, पार्टिकल बोर्ड, प्री-लॅमिनेटेड बोर्ड, UV हाय ग्लॉस पॅनेल्स तसेच विविध प्रकारच्या पॅनेल्सची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली.

मॉड्युलर किचन, वॉर्डरोब, ऑफिस फर्निचर, वॉल पॅनेलिंग यांसह विविध इंटिरियर कामांसाठी योग्य बोर्डची निवड, उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि वापराच्या पद्धती याबाबतही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सेमिनारदरम्यान उपस्थित फर्निचर व्यावसायिक व ग्राहकांनी कंपनीच्या उत्पादनांबाबत विविध प्रश्न विचारले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समाधानकारक माहिती देत आधुनिक फर्निचर क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व दर्जेदार इंजिनिअर्ड वुडचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शहर व परिसरातील फर्निचर व्यावसायिकांना आधुनिक उत्पादनांची माहिती मिळण्याबरोबरच ग्राहकांनाही फर्निचरसाठी योग्य साहित्य निवडण्यास उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button